Ayodhya Ram Mandir: सुरतमधील एका हिरे व्यापाऱ्याने 5000 अमेरिकन हिरे आणि 2 किलो चांदीचा वापर करून बनवला राम मंदिराच्या थीमवर हार (Watch Video)

सुरतमधील एका हिरे व्यापाऱ्याने 5000 अमेरिकन हिरे आणि 2 किलो चांदीचा वापर करून राम मंदिराच्या थीमवर हार बनवला आहे

Gujarat: 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील भगवान श्रीरामाच्या मंदिराचा अभिषेक झाल्यानंतर त्यांच्या चरण पादुकाही ठेवण्यात येणार आहेत. सध्या या पादुका देशभर फिरवल्या जात आहेत. प्राण-प्रतिष्ठा महोत्सवापूर्वी 19 जानेवारीला पादुका अयोध्येत पोहोचतील. या चरण पादुका एक किलो सोने आणि सात किलो चांदीपासून बनवलेल्या आहेत. दरम्यान, सुरतमधील एका हिरे व्यापाऱ्याने 5000 अमेरिकन हिरे आणि 2 किलो चांदीचा वापर करून राम मंदिराच्या थीमवर हार बनवला आहे. 40 कारागिरांनी 35 दिवसांत ही डिझाइन पूर्ण केले आहे. (हे देखील वाचा: Jai Shree Ram Palkhi: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी उचलली ठाण्याहून अयोध्येकडे जाणारी प्रभू रामाची पालखी, पहा व्हिडिओ (Watch)

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)