Muzaffarnagar Harassment Case: कोचिंग सेंटरला जाणाऱ्या तरुणींचा विनयभंग, व्हिडिओ Viral होताच आरोपींवर कारवाई करण्याचे आदेश, एकास अटक (Watch Video)

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. तीन जणांनी कोचींग सेंटरला जाणाऱ्या दोन विद्यार्थिनीचा पाठलाग केला आणि तरुणींचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.

Representative Image (Photo Credits- Pixabay)

Muzaffarnagar Harassment Case: उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. तीन जणांनी कोचींग सेंटरला जाणाऱ्या दोन विद्यार्थिनीचा पाठलाग केला आणि तरुणींचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना धमकावून तेथून फरार झाले. ही घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सीसीटीव्हीत तीन तरुण मुखवटा परिधान करून होते. स्कूटीवरून जाणाऱ्या तरुणींची छेड काढली. हा व्हिडिओ व्हायरल होताच, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री कपिल देव अग्रवाल यांनी पोलिसांना या घटनेवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे. (हेही वाचा- हात पकडून मुलीला म्हणाला 'I love you', थेट घडला 2 वर्षांचा तुरुंगवास, विशेष न्यायालयाकडून खटला 5 वर्षांनी निकालात)

पाहा घटनेचा व्हिडिओ 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now