Vasai Crime: भटक्या कुत्र्याने वाचवली महिलेची अब्रू, आरोपीला अटक, वसई येथील घटना

एका भटक्या कुत्र्याच्या भुंकण्यामुळे महिलीचे इज्जत वाचली आहे. ही घटना मुंबईतील वसई येथील तुंरारेश्वर गल्लीत घडली आहे. महिला कामानिमित्त बाहेर जात असताना एक तरुण तिचा पाठलाग करत होता.

Abuse| (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Vasai Crime:  एका भटक्या कुत्र्याच्या भुंकण्यामुळे महिलीचे इज्जत वाचली आहे. ही घटना मुंबईतील वसई येथील तुंरारेश्वर गल्लीत घडली आहे. महिला कामानिमित्त बाहेर जात असताना एक तरुण तिचा पाठलाग करत होता. त्यावेळीस अचानक तो महिलेच्या समोर आला आणि त्यांने महिले तोंड दाबून तीला खाली ढकलले. ही घटना पाहून जवळच असलेल्या भटक्या कुत्र्याने भुकंण्यास सुरुवात केली. कुत्र्यांच्या भुंकण्याने आरोपी घाबरला. परिस्थितीचा फायदा घेत तेवढ्यात पीडित महिलेने आरोपीला लाथ मारली. (हेही वाचा- एकतर्फी प्रेमात ओलांडल्या सर्व मर्यादा! मुलीच्या मानेवर कात्रीने केले 6 वार, वर्धा जिल्ह्यातील घटना)

आरोपी दुसऱ्या बाजूला पडला घटनास्थळावरून पीडित महिलेचा आयफोन हिसकावून आरोपी फरार झाला. या घटनेची माहिती पीडित महिलेने पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला अटक केले. संतोष खोत असं आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर भटक्या कुत्र्याचं कौतुक केले जात आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement