Holi 2025 Special Train on Special Fare: होळी, उन्हाळी सुट्टीच्या तोंडावर प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून रेल्वेच्या 702 फेऱ्यांची तरतूद; बुकिंग आणि इतर तपशील घ्या जाणून
पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने होळी 2025 आणि उन्हाळी सुट्टीसाठी विशेष गाड्या सोडण्याची तरतूद केली आहे. 702 विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत.
Holi 2025 Special Train on Special Fare: होळी सण (Holi 2025) आणि उन्हाळी सुट्टीनिमित्त प्रवाशांना आपल्या घरी जाण्याची ओढ असते. ही गर्दी लक्षात घेऊन, पश्चिम रेल्वेच्या (Western Railway,) मुंबई विभागाने विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. वाढत्या प्रवासाच्या मागणीचे व्यवस्थापन करण्यासाठी, होळी विशेष गाड्यांच्या 702 फेऱ्या चालवल्या जातील. अधिकाऱ्यांनी सांगितले की या अतिरिक्त सेवा प्रवाशांना दिलासा देण्यासाठी आणि उत्सवासाठी आपापल्या घरी जाणाऱ्यांसाठी सुरळीत प्रवास सुनिश्चित करण्यासाठी आहेत. प्रवाशांना तपशीलवार वेळापत्रक तपासण्याचा आणि शेवटच्या क्षणी होणारा त्रास टाळण्यासाठी आगाऊ तिकिटे बुक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)