West Bengal Shocker: धारदार भाले आणि फायरबॉलच्या हल्ल्यात हत्तीचा मृत्यू; पश्चिम बंगालमधील झारग्राममधील घटना (Watch Video)

गावकऱ्यांच्या गटाने हत्तीच्या कळपावर हल्ला केला. त्यात एका हत्तीचा मृत्यू झाला आहे.

West Bengal Shocker: पश्चिम बंगालच्या झारग्राम जिल्ह्यात गुरुवारी गावकऱ्यांनी धारदार भाले आणि फायरबॉलने(Fireballs) हत्तीच्या कळपावर हल्ला केला. या हल्ल्यात एका हत्तीचा मृत्यू(Elephant Dies) झाला. प्रेरणा सिंग बिंद्रा यांनी या घटनेचा हृदयद्रावक व्हिडीओ सोशल मीडिया एक्सवर शेअर केला आहे. या घटनेत दोन पिल्लांसह सहा हत्तींचा कळप राज कॉलेज कॉलनीत घुसला होता. हत्तींनी परिसरात नुकसान केले होते. त्यांच्यामुळे एका वृद्ध रहिवाशाचा मृत्यू ही झाला होता. गावकऱ्यांच्या हल्ल्यात हत्तीला रॉड लागल्याने गंभीर दुखापत झाली. तिच्या मणक्याला इजा झाली. तिच्यावर उपचार करण्यासाठी वनविभागाने प्रयत्न करूनही आठ तासांनंतर हत्तीणीचा मृत्यू झाला.

व्हिडीओ पहा:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)