Chhattisgarh News: राजनांदगावमध्ये छत्तीसगड महिला काँग्रेस आमदार छन्नी चंदू साहू यांच्यावर चाकूने हल्ला; आरोपीला अटक

छत्तीसगड येथील महिला काँग्रेस आमदार छन्नी चंदू साहू यांच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

Chhanni chandra sahu pc twitter

 Chhattisgarh News: राजनांदगाव जिल्ह्यातील जोधरा गावात एका मुलाने एक महिला काँग्रेस आमदारावर चाकूने हल्ला केल्याने जखमी झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि चौकशी सुरू आहे, असं पोलीसांनी माहिती दिली आहे. रविवारी जोधरा गावात काँग्रेस आमदार छन्नी चंदू साहू एका सार्वजनिक कार्यक्रमात जात असताना ही घटना घडली. ANI ने या संदर्भात माहिती दिली आहे.  "मी भूमिपूजनासाठी जोधरा गावात गेली होती. त्यानंतर मला एका सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावायची होती. मी कार्यक्रमात असताना मागून एका मुलाने माझ्यावर चाकूने हल्ला केला, त्यामुळे माझ्या हाताला दुखापत झाली,"काँग्रेस आमदार छन्नी चंदू साहू यांनी माध्यमांशी माहिती देताना सांगितले. लगेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्याच्यावर डॉक्टरांनी उपचार सूरू केले. हे कृत्य का आणि कोणत्या हेतूने केले आहे हे अद्यापही स्षट झाले नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now