Kanpur: एका मुलीचा विनयभंग करताना पकडल्यानंतर एका व्यक्तीला लोकांकडून बेदम मारहाण करण्यात आली. त्यांच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका मुलीचा विनयभंग करताना पकडल्यानंतर त्याला बांधुन अमानुषपणे मारहाण केली जाते आहे तसेच लोकांकडून त्याचे मुंडण करण्यास भाग पाडले जात असल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील कानपूर येथील आहे. व्हिडीओमध्ये, लोक त्याची चौकशी करत असताना तो चेहरा झाकून गुडघ्यावर बसलेला दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)