Doordarshan News Anchor Sarla Maheshwari Passes Away: दूरदर्शनच्या ज्येष्ठ वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचे निधन; वयाच्या ७१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दूरदर्शनवरील प्रसिद्ध वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
दूरदर्शनच्या सुवर्णकाळातील एक परिचित चेहरा आणि ज्येष्ठ वृत्तनिवेदिका सरला माहेश्वरी यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या. त्यांच्या निधनामुळे भारतीय प्रसारमाध्यम क्षेत्रातील, विशेषतः दूरदर्शनच्या युगातील एक महत्त्वाचा दुवा निखळला आहे. सरला माहेश्वरी यांनी दूरदर्शनवर अनेक दशके वृत्तनिवेदिका म्हणून काम केले. जेव्हा खासगी वृत्तवाहिन्यांचे अस्तित्व नव्हते, अशा काळात त्यांनी आपल्या स्पष्ट शब्दफेकीने आणि संयत सादरीकरणाने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. बातम्या देण्याची त्यांची विशिष्ट शैली आणि आवाजातील गांभीर्य ही त्यांची ओळख होती.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025 स्थगित झाल्यानंतर BCCI ला मदतीसाठी हात! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर
IPL 2025 स्थगित केल्यानंतर BCCI परदेशी खेळाडूंसाठी करणार विशेष व्यवस्था! भारतीय खेळाडूही मायदेशी परततील
IPL 2025 Suspended: शेवटचे आयपीएल कधी करण्यात आले होते स्थगित? जाणून घ्या काय होते कारण
TATA IPL 2025 Suspended: आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित, बीसीसीआयला करोडोंचे नुकसान, येथे जाणून घ्या तपशील
Advertisement
Advertisement
Advertisement