Lok Sabha Election Results 2024: ज्येष्ठ अभिनेते आणि आसनसोल लोकसभा मतदारसंघातील TMC उमेदवार, शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) 26,197 मतांच्या फरकाने आघाडीवर आहेत. पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या 42 जागांवरील विजयी उमेदवारांची नावे आज समजणार आहेत. येथे टीएमसी आणि भाजप यांच्यातच लढत आहे. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी डायमंड हार्बरमधून, क्रिकेटपटू युसूफ पठाण बहरामपूरमधून काँग्रेसचे उमेदवार अधीर रंजन चौधरी, कृष्णनगरमधून तृणमूलचे नेते महुआ मोईत्रा आणि आसनसोलमधून टीएमसीचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा रिंगणात आहेत. मतमोजणीदरम्यान लोकांच्या नजरा पश्चिम बंगालच्या या सेलिब्रिटींवर खिळल्या आहेत. याशिवाय बंगाल भाजपचे माजी अध्यक्ष दिलीप घोष, केंद्रीय मंत्री निशीथ प्रामाणिक, प्रदेश भाजप अध्यक्ष सुकांत मजुमदार यांच्यासह अनेक दिग्गज रिंगणात आहेत.
West Bengal: Veteran actor and TMC candidate from Asansol Lok Sabha seat, Shatrughan Sinha leading from the seat with a margin of 26,197 votes.
(file pic)#LokSabhaElections2024 pic.twitter.com/SGsWbaV38i
— ANI (@ANI) June 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)