Visakhapatnam Fire: विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावर तिरुमला ट्रेनला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही
विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावर शनिवारी दुपारी कोरबा ते तिरुमला या रेल्वेगाडीला भीषण आग लागल्याची माहिती मिळाली. M1, B7, B6 AC बोगी आगीत जळून खाक झाल्यात. आग आटोक्यात आणण्यासाठी रेल्वे अग्निशमन दलाचे जवान बचाव कार्य करत आहे.
Visakhapatnam Fire: विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावर शनिवारी दुपारी कोरबा ते तिरुमला या रेल्वेगाडीला भीषण आग लागल्याची माहिती मिळाली. M1, B7, B6 AC बोगी आगीत जळून खाक झाल्यात. आग आटोक्यात आणण्यासाठी रेल्वे अग्निशमन दलाचे जवान बचाव कार्य करत आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती एएनआयच्या वृत्त संस्थेने दिली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बोगीतून धूर निघताच, प्रवाशी बाहेर पडण्यासाठी धडपड करत आहे. हेही वाचा- वधू-वरांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग, बस जळून खाक, महाराष्ट्रातील बुलढाणा येथील घटना
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)