It Is India's Moment: 'संपुर्ण जग म्हणतंय ही भारताची वेळ आहे, हीच योग्य वेळ आहे'; इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य

पंतप्रधान म्हणाले की, या कॉन्क्लेव्हची थीम 'द इंडिया मोमेंट्स' आहे हे पाहून मला आनंद झाला. आज जगातील सर्व अर्थतज्ञ म्हणतात की हा भारताचा क्षण आहे, परंतु जेव्हा इंडिया टुडेने तो दाखवला तेव्हा तो विशेष होतो. हीच योग्य वेळ आहे.

PM Narendra Modi (PC - Twitter)

It Is India's Moment: आज संपूर्ण जग कबूल करत आहे की, ही भारताची वेळ आहे आणि हीच योग्य वेळ आहे. हा काळ देशासाठी महत्त्वाचा आहे. नवा इतिहास घडत आहे. आज भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, असं महत्त्वपूर्ण वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये केलं आहे. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, या कॉन्क्लेव्हची थीम 'द इंडिया मोमेंट्स' आहे हे पाहून मला आनंद झाला. आज जगातील सर्व अर्थतज्ञ म्हणतात की हा भारताचा क्षण आहे, परंतु जेव्हा इंडिया टुडेने तो दाखवला तेव्हा तो विशेष होतो. हीच योग्य वेळ आहे. इथपर्यंत पोहोचायला 20 महिने लागले. कोणत्याही राष्ट्राच्या विकासाच्या प्रवासात अनेक टप्पे असतात. 21 व्या शतकात आलेला कालखंड आश्चर्यकारक आहे. आजवर जे देश पुढे गेले आहेत त्यांची स्पर्धा कमी होती. आज भारत ज्या परिस्थितीत पुढे जात आहे. त्यासमोरील आव्हाने मोठी आणि वेगळी आहेत. आज सर्वात मोठी महामारी पसरली आहे, दोन देश युद्धात आहेत. यावेळी भारताचा क्षण येणे ही वेगळी बाब आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement