Murder Bid Caught on Camera in UP: पूर्व वैमनस्यातून व्यापऱ्यावर गोळीबार, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे पूर्व वैमनस्यातून एका व्यापारावर गोळी झाडल्याची घटना उघडकीस आली आहे. गोळी मारल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

Murder Bid Caught on Camera in UP: TWITTER

Murder Bid Caught on Camera in UP: उत्तर प्रदेशातील आग्रा येथे पूर्व वैमनस्यातून एका व्यापारावर गोळी झाडल्याची घटना उघडकीस आली आहे. गोळी मारल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आमिर असं हल्ला झालेल्या व्यापाराचे नाव आहे. तर आरोपीचे नाव शाहरुख असं आहे. शाहरुख हिस्ट्री शीटर आहे. शाहरुकने आमिरला काहि दिवसांपूर्वी गोळी झाडून मारून टाकल्याची धमकी दिली होती. या प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली आहे. पोलिस या घटनेची तपासणी करत आहे. दोघांमध्ये पूर्वीपासून वाद होते अशी माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली. (हेही वाचा-  बेवारस बॅगेत सापडला महिलेचा शिरच्छेद मृतदेह, पाटण्याहून मुंबईला जात असलेल्या ट्रेनमधील घटना)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement