Hooch Tragedy In Tamil Nadu: विषारी दारू पिऊन झालेल्या मृतांचा आकडा 34 वर, सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत

तामिळनाडूतील कल्लाकुरिची शहरात दारू प्यायल्याने 34 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण रुग्णालयात उपचार घेत आहे. मृतांची संख्या आणखी वाढेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Death | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Hooch Tragedy In Tamil Nadu: तामिळनाडूतील कल्लाकुरिची शहरात मंगळवारी रात्री विषारी दारू पिऊन झालेल्या घटनेत मृतांचा आकडा 34 वर (died) पोहोचला आहे. तर 60 हून अधिक लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर, उपचार घेत असलेल्या लोकांना प्रत्येकी 50,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्याशिवाय, माजी न्यायमूर्ती बी गोकुळदास यांचा समावेश असलेल्या एक सदस्यीय आयोगाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी 3 महिन्यांत अहवाल सादर करण्याची घोषणा केली. (हेही वाचा:Hooch Tragedy In Tamil Nadu: तामिळनाडूमध्ये कल्लाकुरिची येथे विषारी दारू पिल्याने 25 जणांचा मृत्यू, 60 हून अधिक रूग्णालयात दाखल )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement