Delhi: दिल्लीतील मुखर्जीनगर येथील ज्वेलरी दुकानाच्या बाहेर गोळीबार, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

दिल्लीतील मुखर्जीनगर परिसरातील एका ज्वेलरी दुकानाच्या बाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गोळीबारची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्या कैद झाली आहे.

Firing | Representational image (Photo Credits: pixabay)

Delhi: दिल्लीतील मुखर्जीनगर परिसरातील एका ज्वेलरी दुकानाच्या बाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गोळीबारची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्या कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, एका ज्वेलरी दुकानाच्या बाहेर दुचाकीवरून हेल्मेट घालून एक तरुणाला आला. त्याने खिश्यातली बंदूक बाहेर काढली आणि हवेत दोन ते तीन वेळा गोळीबार केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. एकाने लिहले की, हल्लेखोरांना आता पोलिसांची भिती राहिलीच नाही. तर दुसऱ्याने लिहले आहे की, यांच्यावर लवकर गुन्हा दाखल करावा. ही घटना २४ ऑगस्ट रोजी घडली आहे. (हेही वाचा- कॅनडाच्या व्हँकुव्हरमध्ये पंजाबी गायक एपी धिल्लन यांच्या घराबाहेर गोळीबार)

दुकानाबाहेर गोळीबार पाहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement