RBI Penalty On Banks: RBI ने SBI सह 3 बँकांना ठोठावला मोठा दंड, काय आहे नेमकं प्रकरण? वाचा

मार्गदर्शक तत्त्वांशी संबंधित तरतुदींचे पालन न केल्याबद्दल RBI ने सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँक यांना दंड ठोठावला आहे.

RBI (Photo Credits: PTI)

RBI Penalty On Banks: नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँकांना मोठा दंड ठोठावला आहे. दंड ठोठावण्यात आलेल्या बँकांमध्ये मोठ्या नावांचा समावेश आहे. मार्गदर्शक तत्त्वांशी संबंधित तरतुदींचे पालन न केल्याबद्दल RBI ने सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँक यांना दंड ठोठावला आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआयला केंद्रीय बँकेने 1.3 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. 'कर्ज आणि अॅडव्हान्सेस वैधानिक आणि इतर निर्बंध' आणि आंतर-समूह व्यवहार आणि कर्जाच्या व्यवस्थापनाबाबत जारी केलेल्या सूचनांच्या काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल हा आर्थिक दंड लावण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)