Delhi Shocker: युट्यूब कर्मचारी असल्याचे भासवून तरूणाची फसवणूक करणाऱ्या एकाला अटक; खासगी व्हिडीओ लीक करण्याची धमकी (Video)
दिल्लीच्या सायबर सेलने राजस्थानमधील एकाला तरूणाची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे. युट्यूब कर्मचारी असल्याचे भासवून त्याने खंडणी मागितली होती. त्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली.
Delhi Shocker: दिल्लीत तरूणाची फसवणूक केल्याप्रकरणी राजस्थानमधील एकाला दिल्ली सायबर सेलने एकाला अटक केली आहे. साहिद असे तरूणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साहिदने त्या तरूणाला त्याचे खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हयरल करण्याची धमकी दिली होती. तसे नको हवे असल्यास त्या बदल्यात पैशांची मागणी केली होती. साहिदने पीडित तरूणाला फसवण्यासाठी काही युक्त्या वापरल्या, ज्यामुळे त्याला ही वाटले की त्याचा वैयक्तिक डेटा धोक्यात आहे. त्यानंतर तरूणाने सायबर सेलकडे त्याची तक्रार केली. सायबर सेलने त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले. अखेर त्याला अटक करण्यात आली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)