Parole To Get Wife Pregnant: पत्नीला गर्भवती करण्यासाठी राजस्थान उच्च न्यायालयाने आरोपीला दिली 15 दिवसांची पॅरोल
पॉक्सो कायद्यांतर्गत अल्वर तुरुंगात बंद असलेल्या राहुलला 15 दिवसांचा पॅरोल देण्यात आला आहे.
राजस्थान उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय सध्या चर्चेत आहे. यामध्ये गँगरेपच्या दोषीला 15 दिवस पत्नीसोबत राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. हायकोर्टाने तीन दिवसांपूर्वी त्यांची पॅरोलवर सुटका करण्याचे आदेश दिले. अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणारा 22 वर्षीय आरोपी राहुल बघेल त्याची 25 वर्षीय पत्नी ब्रिजेश देवीसोबत राहणार आहे. पॉक्सो कायद्यांतर्गत अल्वर तुरुंगात बंद असलेल्या राहुलला 15 दिवसांचा पॅरोल देण्यात आला आहे. न्यायालयाचा हा आदेश अलवर तुरुंग प्रशासनापर्यंत पोहोचला आहे. राजस्थानमधील हा पहिलाच निकाल आहे, ज्यात बलात्काराच्या आरोपीला पॅरोल मिळाला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)