काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून उद्या NEET विषयावर संसदेत चर्चेची केली मागणी

आपल्या भाषणाचा मोठा भाग संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आल्यानं आपल्याला धक्का बसल्याचं राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.

Rahul Gandhi | (Photo credit: archived, edited, representative image)

काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील LoP राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून उद्या NEET विषयावर संसदेत चर्चेची विनंती केली आहे. " 24 लाख एनईईटी उमेदवारांच्या हितासाठी रचनात्मकपणे सहभागी होण्याचा आमचा उद्देश आहे. मला विश्वास आहे की तुम्ही या वादाचे नेतृत्व करत असाल तर ते योग्य ठरेल" असे या पत्रात लिहले आहे. दरम्यान भाषणातून मोठा भाग काढून टाकण्यात आल्यानं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी यासंदर्भात लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून यासंदर्भात निषेध व्यक्त केला आहे. आपल्या भाषणाचा मोठा भाग संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आल्यानं आपल्याला धक्का बसल्याचं राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement