Ram Bhajan Shared By PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केला Swasti Mehul यांच्या आवाजातील Ram Aayenge गाण्याचा व्हिडिओ; म्हणाले..., (Watch Video)

डोळे अश्रूंनी आणि मन भावनांनी भरते.' #श्रीरामभजन असा हॅशटॅगही पंतप्रधानांनी या पोस्टमध्ये वापरला आहे.

Swasti Mehul And PM Modi (PC - Facebook)

Ram Bhajan Shared By PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी प्रसिद्ध गायिका स्वस्ति मेहुल (Swasti Mehul) यांच्या आवाजातील 'राम आएँगे' (Ram Aayenge) या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या पोस्टला कॅप्शन देताना पंतप्रधानांनी म्हटलं आहे की, 'स्वस्तिजींचे हे भजन एकदा ऐकले तर ते दीर्घकाळ कानात गुंजत राहते. डोळे अश्रूंनी आणि मन भावनांनी भरते.' #श्रीरामभजन असा हॅशटॅगही पंतप्रधानांनी या पोस्टमध्ये वापरला आहे. स्वस्ती मेहुल जैन ही भारतातील प्रसिद्ध गायिका आहे. तिने बॉलिवूड मनोरंजन क्षेत्रात काम केलं आहे. तिचं सोशल मीडियावर श्रोते आणि प्रेक्षक यांच्याशी खूप छान बॉन्डिंग आहे. तिची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. ती इंस्टाग्रामवर सर्वात ट्रेंडिंग मुलींपैकी एक आहे. ती सहसा तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या जीवनशैलीची आणि आवडीची झलक शेअर करत असते. दरम्यान, येत्या २२ जानेवारीला अयोध्या येथे भगवान श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. यानिमित्ताने देशभरातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. (हेही वाचा - Ayodhya Land Dispute Case मध्ये बाबरी मस्जिद चे मुख्य पक्षकार Iqbal Ansari यांनाही मिळालं राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण (Watch Video))

पहा व्हिडिओ - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)