PM Modi Road Show: तिरुपतीमध्ये PM मोदींचा रोड शो, समर्थकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी
तिरुपतीमध्ये पीएम मोदींनी रोड शो केला. यावेळी समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. पंतप्रधानांनी हस्तांदोलन करून त्यांचे स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 नोव्हेंबरला रविवारी संध्याकाळी तिरुपतीला पोहोचले. ते तिरुपतीजवळील रेनिगुंटा विमानतळावर सायंकाळी 7.40 वाजता उतरले. सोमवारी सकाळी तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरात पूजा करतील. तिरुपतीला पोहोचल्यावर आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस अब्दुल नजीर आणि मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. मोदी तिरुमला येथे रात्र घालवतील, सोमवारी सकाळी मंदिरात प्रार्थना करतील आणि त्यानंतर तेलंगणाला रवाना होतील. तिरुपतीमध्ये पीएम मोदींनी रोड शो केला. यावेळी समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. पंतप्रधानांनी हस्तांदोलन करून त्यांचे स्वागत केले.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)