PM Narendra Modi Wear Mask in Rajya Sabha: संसदेत कोरोनाचा प्रभाव; पंतप्रधान मोदी आणि इतर खासदारांनी राज्यसभेत कामकाजादरम्यान घातला मास्क

कोरोना संसर्गावर देशाला संदेश देण्यासाठी आज दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष मास्क घालून संसदेत पोहोचले.

PM Narendra Modi Wear Mask in Rajya Sabha (PC - Twitter/ANI)

PM Narendra Modi Wear Mask in Rajya Sabha: राज्यसभेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर अनेक खासदार मास्क घालून पोहोचले. त्याचवेळी चीनसोबतच्या तणावाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या 12 व्या दिवशीही गोंधळ सुरूच आहे. कारण विरोधक अजूनही चीनच्या मुद्द्यावर चर्चेच्या मागणीवर ठाम आहेत. त्याचवेळी, कोरोना संसर्गावर देशाला संदेश देण्यासाठी आज दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष मास्क घालून संसदेत पोहोचले. याशिवाय तामिळनाडू, हिमाचल आणि कर्नाटकमधील एसटी यादी सुधारण्यासाठी केंद्र राज्यसभेत तीन विधेयके मांडणार आहे. (हेही वाचा - PM Narendra Modi आज देशातील कोविड 19 च्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी बोलवणार उच्च स्तरीय बैठक)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now