Vice Presidential Election 2022: उपराष्ट्रपती पदासाठी शिवसेनेचा यूपीए उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठींबा

उपराष्ट्रपती पदासाठी शिवसेना यूपीए उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठींबा देणार असल्याची घोषणा खा. संजय राऊत यांनी केली आहे.

Sanjay Raut (Photo Credit - Twitter)

राष्ट्रपती (President Of India) पदासाठीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) या आदिवासी महिला आहेत. देशात आदीवासी जमातीबाबत विशेष भावना आणि आदर आहे. म्हणुन राष्ट्रपती पदासाठी शिवसेनेने (Shiv Sena) एनडीए उमेदवार (NDA Candidate) द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा दिला पण उपराष्ट्रपती (Vice President) पदासाठी शिवसेना यूपीए (UPA) उमेदवार मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांना पाठींबा देणार असल्याची घोषणा खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी (Vice Presidential Election 2022) यूपीए कडून  मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असुन ही उमेदवारी 17 विरोधकांनी मिळून दिली आहे.  मार्गारेट अल्वा राजस्थान (Rajasthan) तसेच उत्तराखंड (Uttarakhand) या राज्याच्या माजी राज्यपाल आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement