किरीट सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर संजय राऊतांची खोचक ट्वीट
दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर किरीट सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र किरीट सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन न्यायलाने फेटाळून लावला आहे. तसेच नील सोमय्या यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान संजय राऊत यांनी ट्वीट करुन पुन्हा त्याच्यावर टीका केली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्यांची विक्रांत फाईल्स उघडत, अनेक खळबळजनक आरोप केले होते. आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत किरीट सोमय्या यांनी घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या (Neil Somaiya) यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर किरीट सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र किरीट सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन न्यायलाने फेटाळून लावला आहे. तसेच नील सोमय्या यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान संजय राऊत यांनी ट्वीट करुन पुन्हा त्याच्यावर टीका केली आहे.
Tweet
बाप बेटे जेल जायेंगे..
अनिल देशमुख नवाब मलिक के बाजुकेही कोठडी मे रहेंगे.. pic.twitter.com/CVgMAlLmOT
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 11, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 11, 2022 06:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

