Nana Patole: शिंदे सरकार हे डाका मारुण आणलेलं सरकार, नाना पटोलेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघात

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

Nana Patole (Photo Credit: Twitter)

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना  ED कडून नव्याने समन्स बजावण्यात आला असुन या समन्सनुसार सोनिया गांधींना 26 जुलै म्हणजे आज  ईडी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याचं पार्श्वभुमिवर काँग्रेस (Congress) जोरदार आक्रमक झाली असून देशभरात कॉंग्रेसकडून निदर्शन करण्यात आली. आज कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात मुंबईत देखील कॉंग्रेसकडू आंदोलन करण्यात आलं. दरम्यान नाना पटोलेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. शिंदे सरकार हे डाका मारुण आणलेलं सरकार, चोरी करुन आणलेलं सरकार आहे म्हणून सरकार स्थापन होवू महिना होण्यावर आला तरी मंत्रीमंडळ स्थापन करु शकले नाही अशी टीका नाना पटोलेंनी शिंदे फडणवीस सरकारवर केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)