Jitesh Antapurkar Resigns: निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आमदार जितेश अंतापूरकर यांचा पक्षाचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आमदार जितेश अंतापूरकर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जितेश अंतापूरकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात
Jitesh Antapurkar Resigns: महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आमदार जितेश अंतापूरकर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जितेश अंतापूरकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात. जितेश अंतापूरकर लवकरच भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत या जागेवरून कोणाला तिकीट दिले जाणार आहे. विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होंटिग केल्यामुळे जितेश अंतापूरकर यांच्यावर पक्षाकडून हल्लाबोल झाला होता. अशोक चव्हाण स्वत: एकेकाळी कॉंग्रेसमध्ये होते. (हेही वाचा- अशोक चव्हाण भाजप प्रवेश करण्याची शक्यता, काँग्रेस पक्ष आणि विधमंडळ सदस्यत्वाचा आजच राजीनामा देणार असल्याची चर्चा)
आमदार जितेश अंतापूरकर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)