Maharashtra CM Eknath Shinde दिल्लीत पोहचले NDAच्या बैठकीला; 2024 मध्ये रेकॉर्डब्रेक विजयाचा व्यक्त केला विश्वास

आज एकीकडे बेंगळूरू मध्ये 26 विरोधी पक्ष एकत्र बैठक घेत आहेत तर दिल्लीत 38 पक्ष एनडीए च्या बैठकीत सहभागी झाले अहेत.

Eknath Shinde | Twitter

Maharashtra CM Eknath Shinde आणि शिवसेना नेते आज (18 जुलै) दिल्लीत पोहचले आहेत. National Democratic Alliance च्या बैठकीमध्ये ते सहभागी होणार आहे. 2024 मध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली रेकॉर्डब्रेक विजय होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी आज विरोधकांच्या होत असलेल्या बैठकीबाबत बोलताना त्यांना टोमणा मारला आहे. अजून विरोधक मोदींविरूद्ध एक नाव देऊ शकत नाहीत यातच मोदीजींचा विजय असल्याचं ते म्हणाले आहेत. PM Modi Brutal Attacks On Opposition: 'कट्टर भ्रष्टाचारी संमेलन' म्हणत पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांच्या बेंगळूरू मधील बैठकीवर हल्लाबोल! 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now