CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला विशेष प्रोटोकॉल नको, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे पोलिसांना निर्देश

हे सर्वसामान्यांचे सरकार असून त्यात व्हीआयपींपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्य असेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

CM Eknath Shinde (Photo Credit - Twitter)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राज्यातील पोलिस प्रशासनाला विशेष निर्देश देण्यात आलेले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा रस्त्याने जाताना वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, यामुळे सर्वसामान्यांना मनस्ताप होतो. रुग्णवाहिका अडकल्यास रूग्णाच्या जीवितासही धोका होऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला विशेष प्रोटोकॉल नको, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना दिले आहेत. तसेच हे सर्वसामान्यांचे सरकार असून त्यात व्हीआयपींपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्य असेल असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement