BMC Removed Rahul Gandhi's Banner : आचारसंहिता लागू होताच मुंबईत बीएमसीने राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचे बॅनर हटवले ( Watch Video )
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. ज्या अंतर्गत प्रचारावर बंदी आली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज शेवट झाला. मुंबईत त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासंबंधिचे बॅनर बीएमसीने हटवले आहेत.
BMC Removed Rahul Gandhi's Banner : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता (Code of Conduct)लागू झाली आहे. या कालावधीत नेत्यांच्या प्रचारावर बंदी असते. दरम्यान, राहुल गांधी (Rahul Gandhi)यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज समारोप झाला. यासंदर्भात मुंबईत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. मात्र, काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी लावलेले सर्व बॅनर बीएमसीने (BMC )हटवले असून काही ठिकाणी रात्रीच्या वेळीही बॅनर उतरवले गेले. (हेही वाचा:BMC New Swimming Pools: बीएमसी लवकरच खुली करणार मुंबईकरांसाठी नव्याने बांधलेले 3 स्विमिंग पूल्स; ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 6 मार्च पासून सुरू)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)