NDA Sarkar: पं.जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसर्‍यांदा Narendra Modi पंतप्रधानपदी होणार विराजमान; NDA च्या बैठकीत संसदीय दलाच्या नेतेपदी निवडीवर शिक्कामोर्तब

9 जून दिवशी संध्याकाळी 6 वाजता नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

PM Modi | X

1962 नंतर दुऱ्यांदा एखादा नेता सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहे. जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर हा मान नरेंद्र मोदी यांना मिळत आहे. एनडीएचे संससदीय दलाचे नेते तसेच लोकसभेचे नेते म्हणून मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव एनडीए च्या बैठकीत राजनाथ सिंह यांनी ठेवला आहे. त्यामुळे आता नरेंद्र मोदी एनडीए सरकारचं नेतृत्त्व करणार आहेत. एनडीएच्या खासदारांची बैठक सेंट्रल हॉलमध्ये पार पडते आहे. या बैठकीत 'फिर एक बार एनडीए सरकार'  चे नारे गुंजले आहेत. 9 जून दिवशी संध्याकाळी 6 वाजता ते पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement