Rupali Patil Thombre VS Amol Kolhe: स्वकर्तुत्व? की नुसत्याच निष्ठेच्या बाता…रुपाली पाटील ठोंबरेंचा अमोल कोल्हेंवर निशाणा; अमित शाह, राज ठाकरे, अजित पवारांसोबतचे फोटो शेअर

राज्यात लोकसभा निवडणूका जाहीर झाल्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. त्यात शरद पवार गट आणि अजित पवार गटही पाठी नाही. स्वकर्तुत्व? की नुसत्याच निष्ठेच्या मोठया मोठया बाता. असं म्हणत रूपाली पाटील ठोंबरे यांनी अमोल कोल्हेंवर निशाणा साधला आहे.

Photo Credit - Facebook

Rupali Patil Thombre VS Amol Kolhe: अजित पवार आणि डॉ.अमोल कोल्हे (Amol Kolhe)यांच्यामुळे शिरुर लोकसभा मतदार संघ चांगलाच चर्चेत आला आहे. भर सभेत अजित पवार यांनी अमोल कोल्हेंचा पराभव करण्याचा निश्चय बोलून दाखवला होता. ज्यांनी मला उमेदवारी दिली त्यांच्या संघर्षाच्या काळात मी ठामपणे उभा आहे याला निष्ठा म्हणतात, असे अमोल कोल्हे म्हणाले होते. आता त्याला रुपाली पाटील ठोंबरे ( Rupali Patil Thombre ) यांनी सोशल मीडियातून उत्तर दिले आहे. अमोल कोल्हे यांच्या निष्ठेचे उदाहरण देताना दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीचे फोटो, कोल्हेंची भाजपात जाण्याची चर्चा, शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थितीचा फोटो रुपाली पाटील ठोंबरे यांनी शेअर केला आहे. सरड्यालाही लाजवेल अशी दैदिप्यमान राजकीय कारकिर्द असे रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटले आहे. (हेही वाचा : Amol Kolhe Pending E-Challans: अमोल कोल्हे यांची वाहतूक पोलिसांवर टीका; MTP ने प्रत्यूत्तर देत उघड केली अभिनेत्याच्या वाहनावरील 16,900 किमतीची प्रलंबित ई-चालानची थकबाकी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now