Ashok Chavan Resigns: अशोक चव्हाण भाजप प्रवेश करण्याची शक्यता, काँग्रेस पक्ष आणि विधमंडळ सदस्यत्वाचा आजच राजीनामा देणार असल्याची चर्चा

महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे.

Ashok Chavan PC Twitter

Ashok Chavan Resigns: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा आजच  सोपविणार असल्याची चर्चा आहे. या घटनेनंतर राजकिय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चाही केली आहे. दोघांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाले हे अद्याप समोर आले नाही. दुसरीकडे, अशोक चव्हाण सत्ताधारी पक्ष भाजपात प्रवेश घेणार असल्याचे चर्चेला उधाण आलं आहे. भाजपामध्ये प्रवेश करण्या बाबत नेत्याने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement