PM Modi on Union Budget 2024: 'देशाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाणारे बजेट'; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रीया

देशाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाणारे, तरुणांना नवनव्या संधी देणारे बजेट असल्याचे मोदी म्हणाले.

PM Modi on Union Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज सलग सातव्यांदा अर्थसंकल्प मांडला आहे. मोदी सरकार 3.0 चा हा पहिला अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्प सादर होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर प्रतिक्रीया(PM Modi on Union Budget 2024) दिल्या आहेत. 'देशाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या या महत्त्वपूर्ण बजेटसाठी मी देशातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि त्यांची पूर्ण टीम कौतूकांसाठी पात्र आहेत. देशातील प्रत्येक स्तरातील नागरिकांना शक्ती देणारे हे बजेट आहे. हे बजेट देशातील गावे, शहरे तसेच शेतकऱ्यांना समृद्धीच्या वाटेवर घेऊ जाणारे बजेट आहे. गेल्या 10 वर्षात 10 करोड लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. सामान्या नागरिकांच्या सशक्तीकरणासाठी हे बजेट आहे. देशातील तरूणांना अनेक संधी देणारे हे बजेट असल्याचे मोदींनी म्हटले आहे.' (हेही वाचा:Union Budget 2024: पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्या तरुणांना 15 हजारांचा प्रोत्साहनपर भत्ता; नोकऱ्यांसदर्भात सरकारची तीन गेमचेंजर योजना )

पंतप्रधान नरेंद्र मोदी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)