Prayagraj: प्रवाशांकडून रेल्वेच्या चादरी चोरण्याचा प्रयत्न; कर्मचाऱ्यांनी पकडले रंगेहाथ, सामानात लपवल्या बेडशीट (Video)
रेल्वेच्या चादरी चोरल्या जाण्याचा एक व्हिडीओ प्रयागराजमधून समोर आला आहे. प्रवाशांना त्यांच्या सामानात ट्रेनच्या बेडशीट लपवताना रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी पाहिले. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
Prayagraj: उत्तर प्रदेशमधील प्रयागराजयेथून एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये रेल्वे कर्मचारी प्लॅटफॉर्मवर प्रवाशांच्या सामानाची तपासणी करताना दिसत आहेत. रेल्वेच्या डब्यातून बेडशीट आणि टॉवेल या वस्तू चोरीला गेल्या होत्या. त्याची तपासनी सुरू असल्याचे या व्हिडीओतून दिसत आहे. 'whoismayankk' नावाच्या वापरकर्त्याने शेअर केलेला हा व्हिडिओ प्रवाशांकडून ब्लँकेट (Bed Sheet)आणि उशीसारख्या रेल्वे मालमत्तेची चोरी करण्याच्या वाढत्या समस्येवर प्रकाश टाकतो. 4,600 हून अधिक पाहिल्या गेलेल्या या व्हिडीओवर टीका केली जात आहे. नेटकऱ्यांनी प्रवाशांच्या या कृतींचा निषेध केला आहे. अशा चोरीसाठी कठोर दंड आकारण्याची मागणी केली जात आहे. एका वापरकर्त्याने प्रतिक्रीया देताना म्हटले की, "एकेकाळी दिल्लीतील पीजीमध्ये राहिलो होतो. पीजी मालकाकडे रेल्वेच्या बेडशीटने भरलेले कपाट होते." दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले की,"आपल्या घरात त्यांचा वापर कसा होईल? घरात आलेल्या पाहुण्यांसमोर हे देणे शरमेची बाब आहे.
प्रवाशांकडून रेल्वेच्या चादरी चोरण्याचा प्रयत्न
Why are people like this?
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)