Pakistan Murdabad By Seema Haider: सीमा हैदरने दिल्या पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा; तिरंगा फडकावून दिला 'भारत माता की जय'चा नारा

पाकिस्तानातील कराची येथील सीमा हैदर ही महिला ग्रेटर नोएडा येथील रबुपुरा येथील रहिवासी असलेल्या सचिनच्या घरी आपल्या चार मुलांसह नेपाळमार्गे व्हिसाशिवाय आली आहे.

Seema Haider (PC - Twitter/@news24tvchannel)

Pakistan Murdabad By Seema Haider: हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिने रबूपुरा येथील घरावर तिरंगा फडकावला. यावेळी त्यांचे पती सचिन आणि अधिवक्ता एपी सिंह देखील उपस्थित होते. सीमाने आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकावून भारत माता की जय आणि हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. पाकिस्तानातील कराची येथील सीमा हैदर ही महिला ग्रेटर नोएडा येथील रबुपुरा येथील रहिवासी असलेल्या सचिनच्या घरी आपल्या चार मुलांसह नेपाळमार्गे व्हिसाशिवाय आली आहे. बेकायदेशीरपणे भारतात आल्याने पोलिसांनी दोघांनाही तुरुंगात पाठवले होते. सध्या दोघेही जामिनावर बाहेर असून रबुपुरा येथे राहत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)