Live Firing In Swimming Pool: पूर्ववैमनस्यातून डोक्यात गोळी झाडून एकाची हत्या; आरोपी फरार, उत्तर प्रदेश मधील घटना (Watch Video)

उत्तर प्रदेश(Uttar Pradesh)मधील मेरठ येथे गोळीबाराची घटना घडली आहे. यात एकाला त्याचा जीव गमवाव लागला आहे. लोहिया नगर पोलीस स्टेशन हद्दीतील स्विमिंग पूलजवळ दोघांमध्ये घटना घडली.

Live Firing In Swimming Pool: पूर्ववैमनस्यातून डोक्यात गोळी झाडून एकाची हत्या; आरोपी फरार, उत्तर प्रदेश मधील घटना (Watch Video)
Photo Credit- x

Live Firing In Swimming Pool:उत्तर प्रदेश(Uttar Pradesh)मधील मेरठ येथे गोळीबाराची घटना घडली आहे. यात एकाला त्याचा जीव गमवाव लागला आहे. लोहिया नगर पोलीस स्टेशन हद्दीतील स्विमिंग पूलजवळ दोघांमध्ये घटना घडली. हा वाद पूर्ववैमनस्यातून झाल्याचे सांगण्यात येत आहे. वादाचे कारण समजू शकलेले नाही. मात्र, घटनेवेळी तेथे 20-30 जण उपस्थीत होते. उपस्थितांनी दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकाने त्याच्या पिस्तूलातून रागाच्या भरात समोरच्या व्यक्तीला किवा उपस्थित कोणालाही काही समजण्याआधीच डोक्यावर पिस्तूल रोखत गोळी झाडली. त्यात एकाचा जागीच मृत्यू(Murder)झाला. ही घटना घडताना तेथे काही लहान मुलेही उपस्थित होती. हल्लेखोर व्यक्तीची हत्या करून घटनास्थळावरून पळून(Accused Absconded) गेला. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून सीसीटीव्ही जप्त केले आहे. (हेही वाचा:Burger Ice Cream Rolls: चर्चेत असलेल्या बर्गर आईस्क्रीम रोलवर खाद्यप्रेमीच्या संतप्त प्रतिक्रीया; पाहा नेटकरी काय म्हणाले (Watch Video))

पोस्ट पाहा- 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 05, 2024 08:28 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).