NEET Paper Leak: नीट पेपर फुटीविरोधात NSUI ची दिल्लीत निदर्शने; NDA सरकारवर केले गंभीर आरोप (Watch Video)
नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI), काँग्रेस युवा शाखा यांनी दिल्लीत जंतर-मंतर येथे राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा (NEET) मुद्द्यावर निदर्शने केली. आंदोलनादरम्यान, NDA सरकारवर गंभीर आरोप केले.
NEET Paper Leak: नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI), काँग्रेस युवा शाखा यांनी दिल्लीत जंतर-मंतर येथे राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा (NEET) मुद्द्यावर निदर्शने केली. आंदोलनादरम्यान, NDA सरकारवर गंभीर आरोप केले. पेपर लीक प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील 14 मंत्री सहभागी असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यांच्या मुलांसाठी NEET चा पेपर फुटला होता. NEET पेपर लीक घोटाळ्यामागील सत्य बाहेर आल्यास केंद्रातील NDA सरकार पडेल, अशा घोषणा यावेळी त्यांनी केल्या. (हेही वाचा:NEET Paper Leak Case: नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणी CBI द्वारा पहिला FIR दाखल )
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)