Zomato Co-Founder Akriti Chopra Resigns: झोमॅटोच्या सह-संस्थापिका आकृती चोप्रा यांनी दिला पदाचा राजीनामा; 13 वर्षांच्या कार्यकाळानंतर सोडली कंपनी
झोमॅटोच्या सह-संस्थापक आणि मुख्य लोक अधिकारी आकृती चोप्रा यांनी कंपनीचा राजीनामा दिला आहे. आकृती चोप्राचा राजीनामा आजपासून म्हणजेच 27 सप्टेंबर 2024 पासून वैध असेल.
Akriti Chopra Resigns: ऑनलाइन फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स कंपनी झोमॅटो (Zomato) च्या सह-संस्थापक आणि मुख्य लोक अधिकारी आकृती चोप्रा यांनी कंपनीचा राजीनामा दिला आहे. आकृती चोप्राचा राजीनामा आजपासून म्हणजेच 27 सप्टेंबर 2024 पासून वैध असेल. झोमॅटो ने त्यांच्या राजीनाम्याची माहिती स्टॉक एक्स्चेंजमध्ये नियामक फाइलिंगमध्ये शेअर केली आहे. चोप्रा यांनी आपल्या एक्झिट मेलमध्ये लिहिले, 'मी आज, 27 सप्टेंबर 2024 रोजी औपचारिकपणे माझा राजीनामा पाठवत आहे. गेल्या 13 वर्षातील हा एक अविश्वसनीय समृद्ध करणारा प्रवास आहे. प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद. सर्वाना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.'
गेल्या वर्षी जानेवारीमध्ये झोमॅटोचे आणखी एक सह-संस्थापक आणि तत्कालीन मुख्य तंत्रज्ञान अधिकारी गुंजन पाटीदार यांनी कंपनीत दशकभराहून अधिक कालावधीनंतर राजीनामा दिला. त्यापूर्वी नोव्हेंबर 2022 मध्ये आणखी एक सह-संस्थापक मोहित गुप्ता यांनी राजीनामा दिला होता. (हेही वाचा: Mumbai Rain: मुंबईत झोमॅटो एजंट मुसळधार पावसात बाइक खराब झाल्यानंतर ऑर्डर देण्यासाठी पायी केला प्रवास)
Zomato Co-Founder Akriti Chopra Resigns-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)