महिलेने दिल्ली विमानतळावर दिला बाळाला जन्म; पहिल्यांदाच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर झाली प्रसूती

याबाबत महिलेला बाळंतपणात मदत करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, एक महिला तिच्या पतीसह टर्मिनल 3 वर फ्लाइटची वाट पाहत होती. त्याचवेळी तिला प्रसवकळा सुरु झाल्या.

बाळाचा जन्म (संग्रहित संपादित प्रतिमा)

दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 3 येथील मेदांता मेडिक्लिनिकमध्ये एका महिलेने  निरोगी बाळाला जन्म दिला आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एखाद्या महिलेची प्रसूती होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याबाबत महिलेला बाळंतपणात मदत करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, एक महिला तिच्या पतीसह टर्मिनल 3 वर फ्लाइटची वाट पाहत होती. त्याचवेळी तिला प्रसवकळा सुरु झाल्या. त्यानंतर तिने विमानतळावर एका मुलाला जन्म दिला. अशाप्रकारे दिल्ली विमानतळाने आपल्या 'सर्वात तरुण प्रवाशा' च्या आगमनाचे स्वागत केले. हे जोडपे मंगळवारी सकाळी कर्नाटकच्या हुब्बालीसाठी विमानाने जाणार होते, परंतु त्यांच्या नशिबात काही वेगळेच लिहिले होते.'

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement