Video: महिलेचा E-Cigarette पितानाचा व्हिडिओ व्हायरल; वडोदराच्या महिला पोलीस ठेवणार गरबा स्थळांवर लक्ष
युनायटेड वे वेन्यूवर गरबा खेळताना एका महिलेची ई-सिगारेट ओढतानाची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी असे आदेश दिले आहेत.
इव्ह-टीझिंगला आळा घालण्यासाठी स्थापन करण्यात आलेले 'महिला' पोलीस पथक आता, परिसरात गरबा खेळून समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांवरही लक्ष ठेवणार आहे. वडोदरा पोलीस आयुक्तांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. पोलीस आयुक्त शमशेर सिंग यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, 'मी टीमला अशा महिलांवर लक्ष ठेवून त्यांना पकडून फौजदारी गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले आहेत.' युनायटेड वे वेन्यूवर गरबा खेळताना एका महिलेची ई-सिगारेट ओढतानाची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी असे आदेश दिले आहेत.
युनायटेड वेचे आयोजक हेमंत शहा यांनीही बहुसंख्य समुदायाला आश्वासन दिले आहे की, सुरक्षा पथकाला अधिक सतर्क राहण्यास सांगितले जाईल आणि मैदानावर गरबा खेळताना सिगारेट ओढणाऱ्या लोकांना पकडले जाईल आणि त्यांना मैदान सोडण्यास सांगितले जाईल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)