Vasai Land Slide: वसईत दरड कोसळली, अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु

वसईत दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दरडीखाली 6 जण अडकले होते, त्यापैकी 2 जणांची सुटका करण्यात यश मिळाले असले तरी या घटनेत एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी आहेत.

Raigad Landslides | (Photo Credits: ANI)

आठवडाभरातील मुसळधार पाऊस बघता राज्याच्या अनेक भागातून दरड कोसळण्याच्या घटना पुढे येत आहे. तसेच आज वसईत दरड कोसळली आहे. या दरडीखाली 6 जण अडकले होते. त्यापैकी 2 जणांची सुटका करण्यात यश मिळाले अशी माहिती मिळत आहे. तरी या घटनेत एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी आहेत. पोलीस आणि वसई विरार महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाचे जवान दुर्घटनास्थळी दाखल झाले असुन बचावकार्य सुरु आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now