Uttarakhand Landslide: उत्तराखंडात मुसळधार पावसानंतर भूस्खलन; 4 मजुरांचा मृत्यू
उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे या भागात मध्यरात्री भूस्खलनाची घटना घडली. यात 4 जणांचा मृत्यू झाला.
हे सर्व नेपाळी नागरिक आहेत. ते मजुरीचे काम करत होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी या घटनेची माहिती दिली आहे. पहाटे 1:20 वाजता फांटा हेलिपॅडजवळील खाट गडेराजवळ 4 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्यासाठी बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले होते.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)