Live Firing Caught on Camera in UP: पतीने घेतलेल्या पैशांसाठी विधवा महिलेवर सावकाराचा गोळीबार (Watch Video)

गोळी दरवाजावर लागल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. गोळीबाराचा थेट व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणात जहांगीरपूर पोलीस ठाण्यात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची चौकशी करत अधिकाऱ्यांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

उत्तर प्रदेश राज्यातील बुलंदशहर येथे हत्या झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाकडून पैसे मिळविण्यासाठी चक्क गोळीबार केला आहे. प्राप्त माहितीनुसार, आरोपीकडून एका व्यक्तीने 50,000 रुपये उसने घेतले होते. पाठीमागच्या काही महिन्यांपूर्वी त्या व्यक्तीची हत्या झाली. असे असताना आरोपीने उसने घेतलेले पैसे परत मिळविण्यासाठी सदर व्यक्तीच्या कुटुंबाला त्रास देणे सुरु केले आहे. सदर सावकाराने (आरोपी) पीडिताच्या विधवा पत्नीच्या घरी जात तिच्या दरवाजावर गोळीबार केला. गोळी दरवाजावर लागल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. गोळीबाराचा थेट व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणात जहांगीरपूर पोलीस ठाण्यात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची चौकशी करत अधिकाऱ्यांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)