UPI and Pre-Sanctioned Credit Lines: खुशखबर! आता बँकांद्वारे पूर्व-मंजूर क्रेडिट लाइनद्वारे करू शकणार यूपीआय व्यवहार, RBI कडून नोटिफिकेशन जारी, जाणून घ्या सविस्तर

यूपीआयची व्याप्ती वाढवण्यासाठी, जमा खात्यांव्यतिरिक्त बँकांमधील पूर्व-मंजूर क्रेडिट लाइनद्वारेदेखील व्यवहार करण्याची परवानगी देण्याचा आरबीआयचा प्रस्ताव होता.

(Photo Credits: AIR/ Twitter)

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) हा भारतामधील एक मोठा आणि मजबूत पेमेंट प्लॅटफॉर्म आहे. सध्या यावर देशातील किरकोळ डिजिटल पेमेंट व्हॉल्यूमपैकी 75% व्यवहार हाताळले जातात. यूपीआय व्यवहार हे प्रामुख्याने बँकांमधील ठेव खात्यांद्वारे होत असतात. अलीकडे, रूपे (RuPay) क्रेडिट कार्डांना यूपीआयशी लिंक करण्याची परवानगी देण्यात आली होती. यूपीआयची व्याप्ती वाढवण्यासाठी, जमा खात्यांव्यतिरिक्त बँकांमधील पूर्व-मंजूर क्रेडिट लाइनद्वारेदेखील व्यवहार करण्याची परवानगी देण्याचा आरबीआयचा प्रस्ताव होता. म्हणजे यूपीआय व्यासपिठावर ग्राहक बँकांकडून मिळणाऱ्या क्रेडिटद्वारे व्यवहार करण्यास सक्षम होतील. आता आरबीआयने या संदर्भातील तपशीलवार सूचना जारी केल्या आहेत.

आरबीआयने जारी केलेल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे की, 'सध्या बचत खाते, ओव्हरड्राफ्ट खाते, प्रीपेड वॉलेट्स आणि क्रेडिट कार्डे यूपीआयशी जोडली जाऊ शकतात. त्यात आता यूपीआयची व्याप्ती वाढवण्यासाठी फंडिंग खाते म्हणून क्रेडिट लाइन्सचा समावेश केला जाणार आहे. या सुविधेअंतर्गत, ग्राहकाच्या पूर्व संमतीने, शेड्यूल्ड कमर्शियल बँकेद्वारे त्यांच्या ग्राहकांना जारी केलेल्या पूर्व-मंजूर क्रेडिट लाइनद्वारे यूपीआय व्यवहार करता येतील.' आरबीआयने पुढे म्हटले आहे, 'बँका, त्यांच्या बोर्डाने मंजूर केलेल्या धोरणानुसार, अशा क्रेडिट लाइनच्या वापरासाठी अटी व शर्ती निश्चित करू शकतात. अटींमध्ये क्रेडिट मर्यादा, क्रेडिटचा कालावधी, व्याजदर इत्यादींचा समावेश असू शकतो.'

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)