UP Shocker: होळीच्या वेळी डीजेवर नाचताना तरुणाला आला हृदयविकाराचा झटका; झाला मृत्यू
घरातील सर्व सदस्य गाण्याच्या तालावर नाचत होते. हा तरुणही सर्वांसोबत नाचत होता आणि त्याचवेळी नाचत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला.
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील मोदीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील लक्ष्मी नगर फफराना बस्ती ग्रीनलँडमध्ये होळीच्या सणावेळी डीजेवर नाचत असताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. हा 30 वर्षीय युवक आपले आई-वडील आणि पुतण्यासोबत होळी साजरी करण्यासाठी दिल्लीहून मोदीनगरला आला होता. त्याचवेळी घरातील सर्व सदस्य गाण्याच्या तालावर नाचत होते. हा तरुणही सर्वांसोबत नाचत होता आणि त्याचवेळी नाचत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला व त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, विनीत कश्यप असे या तरुणाचे नाव असून तो दिल्लीतील एका फोटोग्राफरच्या दुकानात काम करत होता.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Advertisement
Advertisement
Advertisement