COVID-19 New Guidelines: भारतात आंतरराष्ट्रीय प्रवास करून येणार्यांमध्ये आता Random RT-PCR Test होणार नाही
भारतात आंतरराष्ट्रीय प्रवास करून येणार्यांमध्ये आता Random RT-PCR Test होणार नसल्याचं Union Ministry of Health & Family Welfare कडून सांगण्यात आले आहे. आता त्यांनी हा कोविड दरम्यान लागू केलेला मोठा निर्णय अखेर मागे घेतला आहे. रॅन्डमली 2% प्रवाशांची विमानतळावर उतरल्यानंतर आरटीपीसीआर टेस्ट केली जात होती मात्र आता 20 जुलैपासून ही अट शिथिल करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) 5 मे रोजी झालेल्या घोषणेने कोविड-19 ही आता आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी राहिलेली नाही, त्यामुळे साथीचा रोग स्थानिक बनण्याच्या मार्गावर असल्याची आशा निर्माण झाली आहे. असं जाहीर करण्यात आले होते.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)