UK Visa: युकेने 2022 मध्ये भारतासाठी जारी केले सर्वाधिक व्हिसा

गेल्या वर्षी यूकेने 2,836,490 व्हिसा जारी केले, त्यापैकी 25 टक्के भारतासाठी होते.

पासपोर्ट (Image Credits: PTI)

गेल्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये यूकेने (UK) भारताला सर्वाधिक व्हिसा जारी केले आहेत. भारतातील ब्रिटीश उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी यूकेने 2,836,490 व्हिसा जारी केले, त्यापैकी 25 टक्के भारतासाठी होते. भारतीय नागरिकांना सर्वाधिक विद्यार्थी व्हिसा मिळाले आहेत, ज्यात 2021 पासून 73 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2022 मध्ये वर्क व्हिसा 130 टक्क्यांनी वाढला आहे. भारताला 30 टक्के व्हिजिट व्हिसा जारी करण्यात आला आहे, जो इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वात मोठा वाटा आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement