Chhattisgarh Accident: पीएम मोदींच्या सभेसाठी जाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या बसला अपघात, दोघांचा मृत्यू

बसमधील प्रवासी पीएम मोदींच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी अंबिकापूरहून रायपूरला जात होते.

Bus Accident

छत्तीसगडमधील (Chhattisgarh) बेलतारा येथील महामार्गावर शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. येथे पीएम मोदींच्या सभेला जाण्यासाठी अंबिकापूर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांची बस एका ट्रेलरला धडकली, ज्यात दोन जण ठार तर 6 जण जखमी झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये भाजपचे एकूण ४० कार्यकर्ते होते.

बसमधील प्रवासी पीएम मोदींच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी अंबिकापूरहून रायपूरला जात होते. अंबिकापूरहून सुटल्यानंतर बस बेलतरा येथे पोहोचली असताना पहाटे हा अपघात झाला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement