Tiruvannamalai: फेंगल चक्रीवादळामुळे मोठी जिवीतहानी! घरावर दगड कोसळल्याने 5 चिमुकल्यांसह 7 जणांचा मृत्यू (Watch Video)
त्यामुळे तिरुवन्नमलाई येथे एका घरावर दगड कोसळल्याची घटना घडली. ज्यात 5 मुलांसह सात जणांचा मृत्यू झाला.
Tiruvannamalai: तामिळनाडूतील तिरुवन्नमलाई येथे फेंगल चक्रीवादळाचा मोठा तडाखा पहायला मिळाला. सततच्या पावसामुळे तेथील एका घरावर मोठा दगड(Rock Fall) कोसळल्याची घटना घडली. ज्यात 5 मुलांसह सात जणांचा मृत्यू झाला. ज्यातून 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले. उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. 5 लाख रुपयांचा निधी मदत म्हणून देण्यात येणार आहे. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. दक्षिणेत सुरू असलेल्या या वादळी पावसामुळे आत्तापर्यंत मोठ्या संख्येत नागरिकांनी जीव गमावला आहे. (Cyclone Fengal: फैंगल चक्रीवादळामुळे पुद्दुचेरीमध्ये 30 वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद; चेन्नईमध्ये लोकल ट्रेन सेवा सुरू)
घरावर दगड कोसळल्याने 5 चिमुकल्यांसह 7 जणांचा मृत्यू
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)