तिरुमला तिरुपती देवस्थानमला RBI ने ठोठावला 3 कोटी रुपयांचा दंड; FCRA चे केले उल्लंघन

सुब्बा रेड्डी यांनी सांगितले की, तिरुमला तिरुपती देवस्थानमने आरबीआयला दोन हप्त्यांमध्ये दंड म्हणून 3 कोटी रुपये भरले आहेत.

तिरुपती बालाजी मंदिर (फोटो सौजन्य-फेसबुक)

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने भारतातील सर्वात श्रीमंत धार्मिक ट्रस्ट, तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) वर विदेशी योगदान नियमन कायद्याचे (FCRA) उल्लंघन केल्याबद्दल 3 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. टीटीडीचे अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बा रेड्डी यांनी सोमवारी सांगितले की, भक्तांनी हुंडीत टाकलेले विदेशी चलन बँक खात्यात जमा करण्यावर FCRA नियमांचे पालन न केल्याबद्दल आरबीआयने दंड ठोठावला आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानमचा FCRA परवाना 2018 मध्ये कालबाह्य झाला होता आणि त्याचे अद्याप नूतनीकरण केले गेले नसल्यामुळे, TTD बोर्डाला त्यांच्या बँक खात्यांमध्ये विदेशी चलन जमा करण्यात समस्या येत आहेत.

सुब्बा रेड्डी यांनी सांगितले की, तिरुमला तिरुपती देवस्थानमने आरबीआयला दोन हप्त्यांमध्ये दंड म्हणून 3 कोटी रुपये भरले आहेत. तिरुमला तिरुपती देवस्थानमने आरबीआयला FCRA परवान्याचे नूतनीकरण करण्याची विनंती देखील केली आहे. टीटीडीकडे सध्या 30 कोटी रुपयांचे परकीय चलन आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement