Rajkot Airport Canopy Collapsed: गुजरात येथील राजकोट विमानतळावर छत कोसळले, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मुसळधार पावसामुळे गुजरातच्या राजकोट विमानतळावरील छताचा काही भाग कोसळला आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली आहे. विमानतळ टर्मिनलच्या बाहेर पॅसेंजर पिकअप आणि ड्रॉप परिसरात छत कोसळले आहे.

rajkot Airport PC TW

Rajkot Airport Canopy Collapsed: मुसळधार पावसामुळे गुजरातच्या राजकोट विमानतळावरील छताचा काही भाग कोसळला आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली आहे. विमानतळ टर्मिनलच्या बाहेर पॅसेंजर पिकअप आणि ड्रॉप परिसरात छत कोसळले आहे. काल दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावर छत कोसळले होते त्यात एका प्रवाशांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. गेल्या दोन दिवसांत विमानतळावर छत कोसळल्याची दुसरी घटना आहे. (हेही वाचा- मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळली, तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू, उत्तर प्रदेशातील घटना)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now